सनई-चौघडय़ाचा निनाद : भंडाऱ्याची मुक्त उधळण : सवाद्य पालखी मिरवणुक
वार्ताहर/ कोगनोळी
येथील ग्रामदैवत श्री अंबिका देवीचा जागर सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत शनिवार दि. ?? रोजी भक्तीमय वातावरणात व अमाप उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी ? व ? वाजता माजी जिल्हापंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील व तालुका पंचायत सदस्य प्रितम पाटील या?च्या प्रमुख उपस्थितीत आरती करण्यात आली. माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील व मान्यवरा?च्या उपस्थितीत पालखी सोहळय़ाला प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौक, महादेव गल्ली, लोखंडे गल्ली, पी आणि पी सर्कल, मगदूम गल्ली, माळी गल्ली यासह गावातील प्रमुख मार्गावरुन सवाद्य पालखी मिरवणुक काढण्यात आली. सर्वत्र दुर्तफावर रा?गोळी काढण्यात आली होती. तर भाविकांतर्फे पुष्पवृष्टी करण्यात आली. दुपारी ?? वाजता पालखी मंदीरात आल्यावर डिकमली पासून मंदीरापर्यंत मानाचे घोडे पळवून अंबाबाई व बिरदेव पालखीची प्रदक्षिणा घालण्यात आली. पालखी मंदीरात पोहोचल्यावर नारळ फोडण्याचा व खोबरे उधळण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी भंडाऱ्याची मोठ्या प्रमाणात उधळण करण्यात आली. त्यानंतर सनई – चौघडा व ढोल वादन भाविकांचे लक्ष वेधून घेत होता. यावेळी मंदीर परिसर भाविकांनी फुलून गेला होता.
जागर सोहळय़ानिमित्त मंदीरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदीर परिसरात नारळ, साखर, कापूर , उदबत्ती, फुले, फळे, खेळणी, प्रसादासह विविध दुकाने व्यापारा?नी थाटली होती. जागर सोहळय़ानिमित्त सर्वत्र चैतन्याचे वातावरण पसरले होते. तर भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता.
मानकरी व ग्रामस्थांची उपस्थिती
माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी मंडल पंचायत प्रधन शरद पाटील, माजी जिल्हापंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, तालुका पंचायत सदस्य प्रितम पाटील, पीकेपीएस संघाचे चेअरमन अनिल चौगुले, सी.के. पाटील, प्रकाश गायकवाड, कुमार पिडाप – पाटील, अशोक मगदूम, राहूल पाटील, संतोष गायकवाड, आप्पासाहेब मगदूम या?च्यासह मान्यवरा?च्या उपस्थितीत आरती करण्यात आली. या सोहळय़ात मानकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट करणे
तरुण भारतचे कौतुक…..
ग्रामदैवत अंबिका देवीच्या जागर सोहळय़ानिमित्त तरुण भारततर्फे विशेष पुरवणी प्रसिƒ करण्यात आली होती. अंबिका देवीची महती व महिमा मान्यवरा?च्या लेखनातून छायाचित्रासह प्रसिƒ करण्यात आला होता. त्यामुळे पुरवणीचे अंक हातोहात संपले. तर भाविकांनी या पुरवणीचे कौतुक केले.









