प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक गोष्टीची कमतरता पडू नये म्हणून कोकण रेल्वेच्या मार्गावर स्पेशल पार्सल ट्रेनमधून वस्तूंची ने-आण मंगळवारपासून सुरू झाली आहे.
लॉकडाऊनच्या काळात कोकण रल्वे प्रशासनाने ही पार्सल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी ,कणकवली, मडगाव आणि उड्डपी या चार स्थानकांवर या पार्सल ट्रेनमध्ये माल चढवता-उतरवता येणार आहे. या पार्सल ट्रेनचा वापर कोकणातील आंबा देशाच्या अन्य भागात पाठवण्यासाठीही करता येणार आहे. या स्पेशल ट्रेनचे 21 एप्रिल रोजी सकाळी रत्नागिरी स्थानकावर आगमन झाले. यावेळी येथील स्थानकावर पार्सलची ने-आण करण्यात आली. त्यानंतर ही रेल्वे कणकवलीकडे रवाना झाली.









