प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोकण रेल्वेचे माजी मुख्य जनसंपर्क अधिकारी सिध्देश्वर तेलगू यांचे रविवारी सायंकाळी 4 वाजता डोंबिवली जिल्हा ठाणे येथे कोरोनामुळे निधन झाले. मृत्यूसमयी ते 62 वर्षांचे होते.
सिध्देश्वर तेलगू हे 2003 साली पश्चिम रेल्वेतून प्रतिनियुक्तीवर कोकण रेल्वेकडे आले होते. त्यांनी मुख्य जनसंपर्क अधिकारी या पदावर काम केले. पत्रकारांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. मृदूल स्वभाव आणि तत्पर माहिती यामुळे त्यांच्या कामाचा मान वाढला होता. त्यानंतर त्यांनी मुख्य प्रशासन अधिकारी म्हणून देखील काम केले. आपल्या हाताखालील कर्मचाऱयांना सन्मानाची वागणूक देणे, हे त्यांच्या कामाचे वैशिष्टय़ होते. 2 वर्षापूर्वी ते सेवानिवृत्त झाले. त्यांना कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रविवारी सायंकाळी 4 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.









