प्रतिनिधी / रत्नागिरी
कोकण रेल्वेचे कामकाज कंत्राटदारांकडे सोपवावे, असे सरकारच्या मनात आह़े तथापि तोटय़ात चालणाऱया कोकण रेल्वेसाठी कोणीही इच्छुक राहणार नाहीत़ कोकण रेल्वे सरकारनेच चालवावी, अशी आमची इच्छा आह़े ते शक्य नसेल तर त्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढे यावे, असे आवाहन ve@Meveue रेल्वे मजदूर युनियनचे जनरल सेक्रेटरी शिवगोपाल मिश्रा यांनी केले आह़े
राष्ट्रीय मौद्रीकीकरण योजनेची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केल़ी त्यामध्ये कोकण रेल्वेच्या मालमत्तेमधून कोटय़वधी रूपये सरकारी तिजोरीत भाडय़ापोटी जमा करण्याचे त्यांनी जाहीर केल़े या संदर्भात एनआरएमयू या संघटनेने आपली प्रतिक्रिया दिली आह़े संघटनेचे नेते शिवगोपाल मिश्रा म्हणाले, कोकण रेल्वे तोटय़ात चालते. त्यामुळे तेथे कोणतीही बाब स्वीकारण्यास कंत्राटदार पुढे येणार नाहीत़ केंद्र सरकार कोकण रेल्वे चालवण्यास असमर्थ असेल तर राज्य सरकारने ते काम कराव़े राष्ट्रहितासाठी मौद्रीकीकरण अयोग्य आह़े त्या विरोधात आम्ही आवाज उठवू.









