प्रतिनिधी / संगमेश्वर
राष्ट्रीय महामार्गापासून जवळ असलेल्या कोंडअसुर्डे जांभूळवाडी येथील बंद असलेले घर फोडून अज्ञात चोरट्याने सहा लाखांची चोरी केली आहे. सदरची घटना शुक्रवारी रात्री ते रविवार सकाळच्या दरम्यान घडली.
याबाबत संगमेश्वर पोलिस ठाण्यात डॉ. तानाजी सदाशिव दौंड रा. कोंड असुर्डे यांनी फिर्याद दिली आहे. दोंड कुटूंबीय घर बंद करून नातेवाइकांकडे गेले होते. बंद असलेल्या घरात प्रवेश करीत कोणत्या तरी कठीण हत्याराने लोखंडी कपाड तोडून त्यामध्ये ठेवलेले १ लाख ६० हजर रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र आणि इतर सोन्याचे दागिने रोख रक्कम अशी सुमारे ५ लाख ९ ७ हजारांची चोरी झालेली आहे. सासरवाडी येथून ते रविवारी आले असता कपाटातील दागिने व रोख रक्कम चोरीला गेली असल्याचे समजताच पोलिसांना कळविले. संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदय झावरे यांनी घटनास्थळी जावून पहाणी केली.









