प्रतिनिधी / कळंबा
कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या दिवाळी स्टॉलचे उद्घाटन कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक डॉ . शैलेश बलकवडे यांच्या हस्ते सोमवारी झाले. कैद्यांच्या हस्तकलेतुन तयार केलेल्या विविध आकर्षक वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दिवाळीच्या फराळासह आकशदिवे, पणत्या, कपडे, लाकडी खुर्च्या, खेळणी श्रीमंत छत्रपती राजर्षी शाहु महाराजांची प्रतिमा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अशोक स्तंभ यासह अनेक नक्षीकाम केलेल्या लाकडी फोटो फ्रेम विक्रीसाठी समावेश आहे. यावेळी कारागृह अधीक्षक चंद्रमनी इंदूरकर यांनी त्यांचे स्वागत केले. कारागृहातील कैद्यांचे जीवन आणि याठिकाणी कैद्यांवर घडविले जाणारे संस्काराचे अधीक्षक बलकवडे यांनी कौतुक केले. जीवनात कळत – नकळतपणे, अनवधानाने किंवा रागाच्या भरात घडलेल्या एका चुकीमुळे अनेक तरुण बंदी विविध कारागृहांत न्यायालयाने दिलेली.
कारागृहातील कैद्यांचे जीवन आणि याठिकाणी कैद्यांवर घडविले जाणारे संस्काराचे त्यांनी कौतुक केले . जीवनात कळत – नकळतपणे, अनवधानाने किंवा रागाच्या भरात घडलेल्या एका चुकीमुळे अनेक तरुण बंदी विविध कारागृहांत न्यायालयाने दिलेली शिक्षा भोगत आहेत. जीवनातील उमेदीचा काळ कारागृहात घालविल्यामुळे शिक्षा भोगून कारागृहातून मुक्त झाल्यानंतर कुटुंबाच्या व स्वतःच्या उदरनिवार्हासाठी काय काम करायचे; रोजगार मिळेल का, हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. तसेच समाज कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या व्यक्तीस सहजासहजी मुख्य प्रवाहात सामावून घेण्यास इच्छुक नसतो ; कारण अपराधी ‘ या भावनेने त्याच्याकडे पाहिले जाते. यावेळी महिला कैद्यांशी आयुक्त डॉ . कादंबरी बलकवडे यांनी संवाद साधला प्रत्यक्ष भेट देवून माहिती घेतली. त्यानंतर बलकवडे दाम्पत्याच्या हस्ते स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले.
अंबाबाईचा लाडू प्रसाद बनविणाण्या महिला कैद्यांशी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी संवाद साधला. लाडूची चवही चाखली. मशीन विभागात काम करणाण्या कैद्यांची मेहनत पाहून बलकवडे दाम्पत्य भारावून गेले. कार्यक्रमास प्रशासन अधिकारी आर. के. दिघे, बिंदूचौक तुरुंग अधीक्षक विवेक झेंडे, तुरुंग अधिकारी श्रेणी एकचे योगेश पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.