दरवषी भारतामध्ये 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो. 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून मुंबईमध्ये परतले होते. ह्या प्रीत्यर्थ 2003 पासून दरवषी अनिवासी भारतीय नागरिकांच्या भारताच्या प्रगतीमधील योगदानासाठी प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जात आहे. ह्याचे आयोजन भारत सरकारचे अनिवासी भारतीय कार्य मंत्रालय ,फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री ह्यांच्यामार्फत केले जाते. 7 ते 9 जानेवारी दरम्यान भारतामधील एखाद्या शहरात प्रवासी भारतीय दिवसानिमित्त अनेक सोहळे व कार्यक्रम आयोजित केले जातात.
प्रवास करण्याच्या पूर्वापार अशा दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे मानवाने आपल्या बुद्धिचातुर्याने निसर्गाशी नाते जोडत ऋतूंची, पर्वतांची, नक्षत्रांची, नद्यांची, समुद्राच्या भरती-ओहोटीची माहिती करून घेतली. तसेच लहान-मोठय़ा होडय़ा-जहाजांची निर्मिती केली. बैल, उंट, घोडे, गाढव आदी प्राण्यांचा प्रवासात बुद्धिचातुर्याने वापर करून घेत आपला प्रवास सुखकर करून घेतला. नवनवीन भूप्रदेश शोधत आपले जीवन नदीच्या प्रवाहासारखे विस्तारित पुढे नेले.
भारतात प्राचीन काळापासून देशाटनाची परंपरा दिसते. रामायण, महाभारत यासारखी महाकाव्ये तसेच जैन, बौद्ध यांच्या धर्मग्रंथांत, वारकरी संतांच्या रचनेत देशाटनाचे उल्लेख सापडतात. ’मेघदूता’सारखे जगप्रसिद्ध संस्कृत खंडकाव्य शापित यक्षाला प्रवास घडल्याने प्रेमाच्या विरह भावनेतून निर्माण झाल्याचे सर्वश्रुत आहे.
जसजसा काळ बदलत गेला, तसे प्रवासाचे उद्देश बदलत गेले. पूर्वी भारतीयांचा प्रवास धार्मिक वृत्तीतून घडे. त्यामुळे पूर्वी तीर्थयात्रांच्या निमित्ताने सर्व धार्मिक ठिकाणांना भेट देण्यासाठी देशाटन घडे. पुढे विद्यार्जन, दुष्काळ, व्यवसायांचा शोध, व्यापार, आदी कारणांतून देशाटन घडू लागले. देशाटनामुळे विविध प्रदेश, देश यांचा परिचय घडतो. व्यवहारज्ञान, जीवन जगण्याची समृद्ध कला व शास्त्र समजते. व्यक्तिमत्त्व संपन्न व बोलके होते. विद्वानांशी मैत्री होते.
इंटरनेटमुळेच आपल्याला आज प्रवासाचे नियोजन करणे सोपे जाते. नियोजित स्थळी कसे पोहोचायचे, कुठे राहायचे, काय पाहायचे अशी भरपूर माहिती इंटरनेट आपल्याला पुरवते. मला माझ्या तरुण मित्रांना आणि त्यांच्या पालकांना सांगावेसे वाटते की आपल्या सुट्टय़ांचा शक्मय तेवढा वापर आपल्या या सुंदर देशातील वेगवेगळी ठिकाणे पाहण्यासाठी करा. विविध भू-रचना, पर्वत, बदलते वातावरण, किनारपट्टीचा प्रदेश, ऐतिहासिक स्थळ, वारसा स्थळ,जंगलं, जंगली अभयारण्ये, देवस्थाने अशी अनेक ठिकाणे भारतात आहेत, जी अवश्य पाहण्याजोगी आहेत. फक्त बाहेर पडा आणि या जागांचा आस्वाद घ्या. या जागा पाहताना त्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कंगोरे जाणून घेण्याचे प्रयत्न करा. तिथले भोजन चाखा, तिथल्या लोकांशी संवाद साधा आणि कशा प्रकारे ते लोक आपलं जीवन जगतात ते समजून घ्या.
प्रत्येक प्रवास हा एक अनुभव आहे. तो पूर्णपणे जगा. पर्यटन करताना तुमच्या मित्रांना, घरच्यांना पत्रे पाठवून व्यक्त व्हा, स्केचेस काढा, शूट करा, फक्त सेल्फीज नको! हेच छोटे छोटे अनुभव तुमची समज वाढविण्यामध्ये तुम्हाला उपयोगी पडतील आणि एक माणूस म्हणून समृद्ध करतील. इतकेच नव्हे तर तुम्ही जेव्हा प्रवासासाठी बाहेर पडाल, जगाप्रती असलेला तुमचा दृष्टीकोन अधिक उत्क्रांत झालेला असेल.








