प्रतिनिधी /म्हापसा
केरी-पेडणे येथील श्री देव आजोबा देवस्थानचा 73 वा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार दि. 15 रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी 6 वा. अभिषेक, आरती, तीर्थप्रसाद, रात्री 9 वा. देवाच्या फळफुलांची पावणी, रात्री 11 वा. दशावतारी नाटय़प्रयोग सादर करण्यात येईल.
बुधवार दि. 16 रोजी सायं. 3 वा. श्री सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, रात्री 8 वा. गोवन पॅराडाईज ऑर्केस्ट्रा, दि. 17 रोजी सायं. 3 वा. श्री सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, सायं. 7 वा. भजनाचा कार्यक्रम होणार आहे. दि. 18 रोजी सायं. 3 वा. श्री सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, रात्री 9 वा. कोकणी नाटक ‘सायकल’ दि. 19 रोजी सायं. 3 वा. श्री सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, रात्री 8 वा. सेव्हन कलर्स ऑर्केस्ट्रा, रविवार दि. 20 रोजी सायं. 3 वा. श्री सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद होईल. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आले आहे.









