तिरुअनंतपुरम / वृत्तसंस्था
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांनी स्वतःच ट्विटरवरून ही माहिती दिली. 3 मार्च रोजी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेऊनही त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. विजयन यांच्यासह त्यांची कन्या आणि जावई यांचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत. विजयन यांच्यावर कोझिकोड वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
…..









