बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. दररोज वाढणारी कोरोनाची संख्या प्रशासनाची चिंता वाढवत आहे. दरम्यान कर्नाटक सरकारने केरळ, पंजाब आणि महाराष्ट्रातून प्रवेश करणाऱ्या प्रवाश्यांसाठी राज्य सरकारने कोविड नकारात्मक प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. त्यामुळे लोक कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या गोव्याला जाण्यासाठी आणि तेथून कर्नाटकमध्ये प्रवेश करत आहेत. दरम्यान गोव्यातून येणार्या लोकांवर कोणतेही बंधन नाही.