वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
बिजनेस टायकून अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वातील असणारी कंपनी वेदान्ता लिमिटेड भारतीय तेल युनिट केयर्न ऑईल ऍण्ड गॅस व्यवसायातील जवळपास 20 टक्के हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत आहे. जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोविड 19च्या संकटामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी सततची घसरण आणि यामुळे कंपनीच्या नफ्यात होणाऱया घटीमुळे हा निर्णय घेण्यासाठी विचार करण्यात आल्याचे म्हटले आहे.
वेदान्ता आपले कर्ज फेडण्यासाठी केयर्न ऍण्ड गॅस व्यवसायातील हिस्सेदारी विकणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या व्यवहारातून वेदान्ता 7.5 हजार कोटी रुपयांची उभारणी करण्याच्या तयारीत असून त्यासाठीच कंपनी ही योजना आखत असल्याचीही माहिती मिळते आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये आलेल्या अस्थिरतेमुळे केयर्नमधील आपली हिस्सेदारी विकणार आहे. कंपनी आपल्या डोक्मयावरील असणारे कर्ज फेडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे.









