वार्ताहर / केपे
कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निर्जंतुकीकरण मोहीम जाहीर केलेली असून त्या अनुषंगाने नुकतेच केपे, तिळामळ व जांबावली या परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले. कुडचडे अग्निशमन दलाचे अधिकारी राहुल देसाई, श्री. कार्दोज, रोहन गावस, एम. एम. डिकॉस्ता, एस. पी. नाईक, सत्यजित देसाई व इतरांनी मिळून ही मोहीम राबविली. केपे येथे नगरपालिका, मामलेदार कार्यालय इमारत, वाहतूक खात्याच्या कार्यालयाची इमारत, सर्व दुकाने, मासळी बाजार व उर्वरित सर्व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. तसेच दियांव येथील मिशनरीज ऑफ चॅरिटी, लेडी ऑफ लॉर्ड्स चर्च परिसर व सभागृह, आंबावली त्याचबरोबर तिळामळ बाजार परिसर व जांबावली परिसरातही ही मोहीम राबविण्यात आली.









