ऑनलाईन टीम / टोकियो :
जपानमधील केन तनाका ही महिला जगातील सर्वात वयोवृद्ध महिला ठरली आहे. तनाका यांची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद झाली आहे.
जपानमधील फुकुओका शहरातील एका नर्सिंग होममध्ये तनाका राहतात. त्यांचा जन्म 2 जानेवारी 1903 मध्ये फुकुओकाजवळील वजीरो गावात झाला. सध्या त्यांचे वय 117 वर्ष 261 दिवस आहे. त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत आहे, असे त्यांचा नातू इजी तनाका यांनी म्हटले आहे.
यापूर्वी जगातील सर्वात वयोवृद्ध महिलेचा विक्रम नबी ताजिमा यांच्या नावावर होता. एप्रिल 2018 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे वय 117 वर्षे 260 दिवस होते. तनाका यांनी शनिवारी ताजिमा यांचा विक्रम मोडला.