वारणानगर / प्रतिनिधी
केखले (ता. पन्हाळा ) येथील आनंदा तुकाराम माने यांच्या जनावरांच्या गोट्याला अचानक आग लागली. या लागलेल्या आगित सुमारे पावणेदोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज दुपारी ऊनाच्या तडाख्यात दिडच्या सुमारास घडली.
घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की आनंदा तुकाराम माने यांचा गोटा सुतारांच्या शेताशेजारी असुन सोमवारी दि १५ रोजी दुपारी दिडच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत गोठ्यामधे असलेल्या एक गाय व कालवड जखमी झाली असुन जनावरांना सोडवताना आनंदा माने यांचे वडिल किरकोळ जखमी झाले असून गोठ्यात असलेले छापकटर धान्यांनी भरलेली टोपली लागवडीची पोती सायकल शेतीची अवजारे पाण्याचे बॅरेल नवीन ताडपदरी संसार उपयोगी व प्रापंचीक साहित्य जळाले .
असे सुमारे पावणे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमुद केले आहे. घटनास्थळी तलाठी अमोल कोटे सुभाष सुर्यवंशी सरपंच हंबीर चौगुले मा.सरपंच ग. रा. पाटील पोलिस पाटील कुंडलिक निकम यांनी घटनास्थळी भेट दिली









