बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (केएसआरटीसी) मंगळवारी जाहीर केले की शेजारच्या तामिळनाडूतील विविध ठिकाणी जाण्यासाठी विशेष बसगाड्या सोडल्या जाणार आहेत.
प्रवासी जनतेच्या सोयीसाठी केएसआरटीसी कर्नाटकातील वेगवेगळ्या ठिकाणांहून तमिळनाडू राज्यातील विविध ठिकाणी सर्व नियमित सेवा सुरू ठेवेल. प्रवाशांची घनता लक्षात घेऊन या सेवा चालवल्या जातील, असे केएसआरटीसीच्या निवेदनात म्हटले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसस्थानकांवर गर्दी होऊ नये म्हणून सर्व प्रवाशांना मास्क घालणे आणि ऑनलाईन तिकीट सुविधेचा वापर करणे बंधनकारक आहे, असे म्हंटले आहे.









