कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांची माहिती : तिसऱया लाटेला थोपविण्यासाठी तयारी
प्रतिनिधी / बेळगाव
केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये गर्भवती आणि मुलांसाठी 40 बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. कोरोनाच्या तिसऱया लाटेची शक्मयता आणि ब्लॅक फंगस यावर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलने तयारी केली आहे, अशी माहिती केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी दिली आहे.
कोरोना सर्वांनाच भयभीत करत आहे. गर्भवतींनासुद्धा कोरोनाचा संसर्ग होत आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी 20 बेड राखीव ठेवण्यात आले असून वेगळा वॉर्ड आणि स्वतंत्र लेबर रुम सुरू करण्यात आली आहे. लहान मुलांना तिसरी लाट त्रासदायक ठरू शकते, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. उपचारात अडचणी येवू नयेत यासाठी हॉस्पिटलने तयारी केली आहे.
सौम्य लक्षणे असणाऱयांना किंवा नसणाऱयांना क्वारंटाईन रहावे लागते. ज्यांना घरात क्वॉरंटाईन होता येत नाही अशांसाठी केएलईतर्फे निंगराजकॉलेजमध्ये कोरोना केअर सेंटर सुरू केले असून ते 24 तास कार्यरत आहे. अशी माहिती त्यांनी दिली.
ब्लॅक फंगसचा संसर्ग झालेल्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागते. नेत्र, कान, नाक, घसा, तेंड आणि प्लास्टिक सर्जरी करणारे तज्ञ त्यांच्यावर उपचार करतात. संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. दुसऱया लाटेमध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटरची गरज भासते, त्यासाठी केएलईमध्ये 2500 एलटीएम क्षमतेचे ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात येत आहेत.









