ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. सिंह यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.
सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला सौम्य लक्षणं आहेत. मी सध्या होम क्वारंटाईनमध्ये आहे. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने स्वत:ला आयसोलट करुन चाचणी करुन घ्यावी.
देशात कोरोनाच्या तिसऱया लाटेचा उद्रेक पहायला मिळत असून, अनेक राजकीय नेतेही कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. कोरोनाची ही तिसरी लाट जानेवारी अखेरीस पीकवर असेल, अशी भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे.









