ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रीय निमलष्करी दलांसाठी गृहमंत्री अमित शाह 23 जानेवारीला आसाममध्ये आयुष्मान स्वास्थ्य योजना सुरू करण्याची शक्यता आहे. अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने एका संकेतस्थळाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
आयुष्मान भारत योजनेला केंद्र सरकार जगातील सर्वात मोठी आरोग्य योजनामानते. या योजनेअंतर्गत वार्षिक 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जातात.केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) आणि सशस्त्र सीमा बल (एसएसबी) यांसारख्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांचे प्रमुख, उप अधिकारी आणि एक-एका जवानाला अमित शाह हेल्थ कार्ड वाटप करणार आहेत.









