ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना कोरोनाची बाधा झाली आहे. नाईक यांनीच ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.
नाईक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘मी माझी कोरोना चाचणी करून घेतली. त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून, मी आता होम आयसोलेशनचा पर्याय निवडला आहे. मागील काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घ्यावी, तसेच आपली काळजी घ्यावी’
मोदी सरकारच्या मंत्रीमंडळातील तीन मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे. पहिल्यांदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, त्यानंतर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि आता आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना कोरोनाची बाधा झाली आहे.









