ऑनलाईन टीम/तरुण भारत
गेल्या काही महिन्यांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं दिसून येत आहे. गेला महिनाभर या किंमती काहीशा स्थिर राहिल्या असल्या, तरी तोपर्यंत पेट्रोलचे दर प्रतिलिटर १०० च्याही वर गेले आहेत. निर्मला सीतारमण यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मंगळवारी राज्यसभेत बोलताना इंधनावरील करांच्या माध्यमातून केंद्रानं गेल्या तीन वर्षांत किती कमाई केली, याची माहिती दिली.
यानुसार, गेल्या तीन वर्षांत अर्थात २०१८ पासून इंधनावरील करांच्या माध्यमातून केंद्रानं तब्बल ८ लाख कोटींची कमाई केली आहे. यापैकी ३.७१ लाख कोटी रुपये २०२०-२१ या एकाच वर्षात केंद्राच्या तिजोरीत जमा झाल्याचं निर्मला सीतारमण यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात म्हटलं आहे.