संरक्षण खात्याचा आदेश, 11 पर्यंत मुदत : प्रशासक नियुक्त होणार
प्रतिनिधी / बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या लोकनियुक्त सभागृहाची पाच वर्षांची मुदत मागीलवषी फेब्रुवारीमध्ये संपु÷ात आली होती. मात्र कोरोनामुळे निवडणूक लांबणीवर टाकून सभागृहाला दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र आता निवडणुका घेण्याच्या दृष्टीने संरक्षण खात्याने हालचाली चालविल्या असून, दि. 11 फेब्रुवारी रोजी सभागृह बरखास्त करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
देशातील 56 कॅन्टोन्मेंट बोर्डची मुदत मागील फेब्रुवारीमध्ये संपली होते. मात्र कोरोनामुळे निवडणुका लांबणीवर टाकून लोकनियुक्त सभागृहाला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र सहा महिन्यानंतरही कोरोना आटोक्मयात आला नसल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुका संरक्षण खात्याने घेतल्या नाहीत.
देशात निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून संरक्षण खात्याने 56 कॅन्टोन्मेंट बोर्डच्या लोकनियुक्त सभागृहाची मुदत पुन्हा सहा महिन्याने वाढविली होती. ही मुदत फेब्रुवारीत संपणार आहे. त्यामुळे संरक्षण खात्याने अधिसूचना काढून कॅन्टोन्मेंट बोर्डचे लोकनियुक्त सभागृह दि. 11 फेब्रुवारी रोजी बरखास्त करण्याची सूचना केली आहे. आगामी 1 वर्षाच्या कालावधीकरीता हे सभागृह बरखास्त राहणार असून, प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. कोरोना विषाणुच्या प्रसारामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सदस्यांना 1 वर्षाचा जादाचा अवधी मिळाला. निवडणुका घेण्याच्या दृष्टीने संरक्षण खात्याने कोणतीच तयारी केली नाही. त्यामुळे पुन्हा मुदतवाढ मिळणार का? असा मुद्दा उपस्थित झाला होता.









