प्रतिनिधी/ बेळगाव :
येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा निरंजना अष्टेकर व माजी उपाध्यक्ष प्रदीप अष्टेकर या दांपत्याकडून रविवारी शहरात विविध ठिकाणी भाजीपाल्याचे वाटप करण्यात आले.
लॉकडाऊन काळात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जीवनाश्यक साहित्य मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे अष्टेकर यांच्याकडून शहरात पीडल्ब्यूडी क्वार्टर्स, फॉरेस्ट क्वार्टर्स, केएसआरटीसी क्वार्टर्स, किल्ला आदींसहीत विविध भागात भाजीपाल्याचे वाटप करण्यात आले आहे.
यावेळी परशराम मुरकुटे, सचिन पाटील, महेश शिगीहळ्ळी, इर्शाद चांदवाले, श्रीनिवास नाईक, संतोष दिवटे, शब्बीर पटवेगार आदी उपस्थित होते.









