वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कॅनरा बँकेने शुक्रवारी कोरोना महामारीच्या विरोधात लढाई लढण्यासाठी तीन कर्ज योजनांचे सादरीकरण केले आहे. सदरची कर्ज योजना आरोग्य सेवा, व्यवसाय आणि व्यक्तिगत कर्जाशी संबंधीत आहे. नोंदणीकृत रुग्णालय, नर्सिग होम, डायग्नोस्टिक केंद्र आणि आरोग्य काळजी केंद्राच्या पायाभूत सुविधांच्या शाखांसाठी 10 लाख रुपये ते 50 कोटी रुपयांपर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे कॅनरा बँकेने सांगितले आहे.
कॅनरा बँकेने दिलेल्या माहितीनुसार व्याजदराप्रमाणे देण्यात येणाऱया कर्जाचा कालावधी हा 10 वर्षांसाठी राहणार असून यामध्ये 18 महिन्यांची अतिरिक्त सवलत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









