वृत्तसंस्था/ मार्सेली
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या मार्सेली खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत कॅनडाच्या 21 वषीय फेलिक्स ऑगर ऍलियासिमेने फ्रान्सच्या अनुभवी त्सोंगाचा पराभव करत एकेरीच्या शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले आहे.
एटीपी टूरवरील 250 दर्जाच्या या स्पर्धेत गुरुवारी ऍलियासिमेने त्सोंगावर 7-6 (7-2), 6-2 अशा सरळ सेट्समध्ये मात केली. या सामन्यात ऍलियासिमेने 7 बिनतोड सर्व्हिसची नोंद करताना बेसलाईन खेळावर अधिक भर दिला होता. गेल्याच आठवडय़ात ऍलियासिमेने एटीपी टूरवरील रोटरडॅम टेनिस स्पर्धा जिंकली होती. ऍलियासिमेचा पुढील फेरीतील सामना बेलारुसच्या इव्हाश्काशी होणार आहे.









