रुक्मिणी, जाम्बवंती, सत्यभामा यांच्या नंतर कालिंदीबरोबर कृष्णाचे लग्न झाले. हे त्याचे चौथे लग्न होते. त्यानंतर महामुनी शुकदेव पुढील कथा सांगतात –
त्यानंतरें अल्पा दिवसीं ।
द्वारके वसतां श्रीहृषीकेशी।
अवंतीहूनि सर्वां देशीं ।
मूळें रायांसि पैं आलीं ।
विंदानुविंद बंधु दोघ ।
दुर्योधनासिं स्नेहयोग ।
तद्वशवर्ती होऊनि अनुग ।
राज्यभूभाग भोगिती ।
दुर्योधनाच्या स्नेहादरें ।
कृष्णीं वर्तती द्वेषाचारें ।
तिहीं भूपति निज सोयरे ।
पत्रद्वारें पाचारिले ।
क्षिप्रापगेच्या उभय तटीं ।
शिबिरें उभिलीं लक्ष कोटी ।
भूमंडळींच्या भूभुजथाटी ।
अवंती निकटीं उतरलिया ।
मित्रविंदेचें स्वयंवर ।
ऐकोनि मिळाले नृपवर ।
एक वर्जूनि द्वारकापुर ।
सोयरे अपार पातले ।
विंद आणि अनुविंद हे दोघे अवंती देशाचे राजे होते. ते दुर्योधनाच्या मनाप्रमाणे वागणारे आणि कृष्णाचा द्वेष करणारे होते. त्यांनी आपली सुंदर बहीण मित्रविंदा हिचे स्वयंवर करायचे ठरवले. कृष्ण सोडून सर्व राजांना निमंत्रणे पाठविली. निमंत्रणाप्रमाणे सर्व राजे आले. क्षिप्रा नदीच्या दोन्ही तिरांवर निमंत्रित राजांनी आपापल्या लव्याजम्यासह शिबिरांमध्ये मुक्काम केला. परंतु इकडे मित्रविंदेच्या मनात काय चालले होते ते
पहा-
गुण लावण्य ऐश्वर्यथोरी ।
श्रीकृष्णाची परस्परिं ।
ऐकोनि मित्रविंदा सुंदरी ।
मनें निर्धारी हरि भर्ता ।
मातेपासीं कथिलें गुज ।
जें मम भर्ता गरुडध्वज ।
हें ऐकोनि अवंतिराज । म्हणती लाज हे आम्हां ।
कृष्णासि नाहीं नृपासन।
केवळ गोरक्ष हीन दीन ।
चैद्य मागध दुर्योधन ।
भूभुज मान्य हे आम्हां ।
मित्रविंदेतें निषेधिती ।
कृष्ण अयोग्य नृपसंपत्ति ।
यालागिं सांडूनि तदासक्ति ।
वरिं भूपति माने तो ।
भूमंडळींचे भूप ।
अमोघ ऐश्वर्य शौर्य प्रताप । त्यांमाजि पाहूनि ऐश्वर्यकल्प । लावण्यदीप नृप वरिजे।सहज येतील स्वयंवरिं । श्रवणें नयनें पाहोनि विवरिं । प्रियतम वाटेल तो तूं वरिं ।
भगिनी यापरी प्रबोधिती । ऐकोनि बंधूंचें उत्तर ।
जेविं मृद्घटीं दृढ पाथर । पडतां भंगी तेंवि अंतर ।
भंगोनि विचार हारपला । थरथरा कांपे अंगयष्टि ।
झरझर नीर पाझरे दृष्टी । मर मर दैवा म्हणोनि कष्टी। होय गोरटी अनुतापें ।
देवदत्त परुळेकर