ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये केंद्रीय राखीव दलाच्या 31 जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे. सीआरपीएफकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
कुलगाममध्ये सीआरपीएफच्या 90 बटालियनमधील 300 हून अधिक जवानांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यामध्ये 31 जवानांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जवानांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कुलगाम, पुलवामा या भागात दहशतवाद्यांसोबत सीआरपीएफच्या कारवाया सुरू आहेत. यामध्ये 90 बटालियनमधील जवानांचा सक्रिय सहभाग आहे. मात्र, या बटालियनमध्ये कोरोनाचे 31 बाधित आढळल्याने 18 व्या बटालियनचे जवान दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत सामील झाले आहे.









