कुर्डुवाडी / प्रतिनिधी
कुर्डुवाडी रेल्वे कारखान्याच्या इतिहासात प्रथमच कर्मचारी आणि अधिकारी अशा ५११ जणांची नियुक्ती येत्या दोन महिन्यात होणार असल्याची माहिती कारखाना उप मुख्य यांत्रिक अभियंता संजय साळवे यांनी दिली. या भरतीमुळे रेल्वे कारखान्याला उर्जितावस्था प्राप्त होणार असून पुन्हा नव्याने कुर्डुवाडी शहराला गतवैभव प्राप्त होणार आहे. तसेच एम आय डी सी मध्ये नवीन उद्योगाला चालना मिळणार असून तालुक्याचे अर्थकारण यामुळे बदलणार आहे.
कुर्डुवाडी रेल्वे कारखान्याचे उपमुख्य यांत्रिक अभियंता संजय साळवे यांनी वारंवार मागणी व पाठपुरावा केल्यानंतर महाप्रबंधक मध्य रेल्वे मुंबई संजीव मित्तल,मुख्य प्रधान यांत्रिक अभियंता ए के गुप्ता ,मुख्य कारखाना अभियंता बी एम अग्रवाल व परेल रेल्वे कारखान्याचे मुख्य प्रबंधक विवेक आचार्य यांनी मनावर घेऊन या ५११ लोकांची भरती करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.यामध्ये २९ कार्यालयीन कर्मचारी व ४८२ अभियंते,पर्यवेक्षक व तांत्रिक कर्मचारी अशा ५११ लोकांची भरती होणार आहे. ही भरती प्रकिया रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या माध्यमातून कशाप्रकारे होणार आहे.हे रेल्वे विभागाकडून नंतर कळविण्यात येणार आहे. दोन महिन्याच्या आत हे लोक भरती होणार असून यानंतर दर महा २० ते १२० कोचेस पर्यंतचे पी ओ एच चे काम वाढणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









