प्रतिनिधि- कुडाळ
जिल्ह्यातील कुडाळ, दोडामार्ग, देवगड,वैभववाडी नगराध्यक्षपदासाठी सोमवारी १४ फेब्रुवारीला निवडणूक झाली. यात हाय होल्टेज ड्रामा ठरलेल्या कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या सौ.आफ्रीन करोल तर उपनगराध्यक्षपदी मंदार शिरसाट यांची निवड झाली. सदरच्या विजयाने महाविकास आघाडीच्या गोटात उत्सवाचं वातावरण पाहायला मिळत आहे.









