सतरा जागेसाठी ४४ उमेदवार निवडणूक रिंगणात
वार्ताहर / कुंभोज
कुंभोज तालुका हातकणंगले येथे प्रभाग क्रमांक 3 मधून काँग्रेस-राष्ट्रवादी, शेतकरी संघटना शिवसेना प्रणित महाविकास आघाडीचे उमेदवार स्मिता सुदर्शन चौगुले यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या विरोधातील सर्व अर्ज चर्चेनंतर माघार घेतल्याने चौगुले यांचा बिनविरोधचा मार्ग सुकर झाला परिणामी चौगुले हा नेमक्या कोणत्या गटाच्या यावर बराच काल वातावरण तंग झाले होते. परिणामी रात्री उशीरा झालेल्या बैठकीमध्ये विजयी उमेदवार स्मिता सुदर्शन चौगुले यांनी आपण महाविकास आघाडीतुन विजयी झाल्याची घोषणा केली व दिवसभर चाललेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.
महाविकास आघाडीची कुंभोज येथील सतरा पैकी एक जागा बिनविरोध झाल्याने आघाडीत उत्साहाचे वातावरण पसरले आहे. परिणामी 17 सदस्य ग्रामपंचायत असणाऱ्या कुंभोज ग्रामपंचायतसाठी जवळजवळ 44 उमेदवार निवडणूक रिंगणात असून महाविकास आघाडी विरोधात जनसुराज्य आरपीआय, जय शिवराय किसान संघटना व भाजप एकत्रित लढत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी दोन्ही आघाडीच्यावतीने आपापल्या परीने प्रचाराला शुभारंभ करण्यात आला असून आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी गटनेत्यांनी कंबर कसली याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. माझी पंचायत समिती सदस्य संतोष माळी यांनीही काही प्रभागात आपले उमेदवार अपक्ष म्हणून उभे केले असून अपक्ष उमेदवाराचा फटका नेमका कोणाला बसणार याकडे कुंभोज ग्रामस्थांचे लक्ष वेधले आहे.
परिणामी कुंभोज ग्रामपंचायत बिनविरोध होणार का यासाठी सर्वच गटाच्या नेत्यांनी प्रयत्न केले परंतु कुंभोज ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यामध्ये गावातील सर्व संघटनांच्या नेत्यांना अपयश आले, परिणामी महाविकास आघाडीची धुरा जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, किरण माळी, प्रकाश पाटील, डॉक्टर सत्यजित तोरसकर, महेश पाडंव तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सांभाळत आहेत तर विरोधी आघाडीचे नेतृत्व वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील, किरण नामे बलुपंत कुलकर्णी, अमोल गावडे, विनायक पोद्दार श्रीकांत पालके, समीर भोकरे, आदी मंडळी करत आहेत. परिणामी निवडणूक रिगणात गटप्रमुखाचे काही वारसदार उमेदवार असल्याने सदर निवडणुकीला चांगलीच रंगत आल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार स्मिता चौगुले यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार बिपीसी पेट्रोलियम येथे महाविकास आघाडीच्या गटप्रमुख यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी किरण माळी, सुनील वाडकर, विपुल चौगुले, बाबासाहेब चौगुले, रविराज जाधव, विठ्ठल सपकाळ पंकज पाटील, महेश पांडव, अभिनंदन चौगुले, सुदर्शन चौगुले, भरत भोकरे तसेच रेल्वे ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.