वार्ताहर / कुंभोज
कुंभोज तालुका हातकणंगले व परिसरात सध्या खाजगी तत्त्वावर चालणारे काही सहकारी साखर कारखान्यांच्या ऊस तोडणी कामगारांची टोळ्या मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून कुंभोज हिंगणगाव कवठेसार परिसरात सध्या खासगी कारखान्यांच्या ऊस तोडणीला सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी सदर खाजगी करखाने येणाऱ्या उसाला योग्य दर दिला जाईल अशी माहिती शेतकऱ्यांना देऊन ऊस तोडणी चालू केल्याचे चित्र कुंभोज परिसरात सध्या पहावयास मिळत आहे.
परिणामी एफ आर पी व ऊसदराचा प्रश्न मिटला की नाही हे जाहीर झाले नसतानाही सुरू असणाऱ्या ऊसतोडीमुळे शेतकरी वर्गात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. परिणामी मागील दोन वर्षात पुरामुळे मोठ्या प्रमाणात नदीकाठावरील उसाचे नुकसान झाले असून, यावेळी शेतकरी कशाचा हि न विचार करता खाजगी अथवा सहकारी तत्त्वावरील कोणत्याही कारखान्यास तोडी साठी येणाऱ्या ऊस देत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी सध्या कुंभोज परिसरात जवळ जवळ वीस खाजगी तत्त्वावरील सहकारी साखर कारखान्यांच्या ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्या दाखल झाले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









