प्रतिनिधी /फोंडा
मानसवाडा-कुंडई येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानात वार्षिक दसरोत्सव भाविकांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शनिवारी सकाळी देवस्थानात धार्मिक विधी, दुपारी श्रीची पूजा, त्यानंतर श्रीची पालखीतून व तरंगाची मिरवणूक काढण्यात आली. शनिवारी रात्री देवी नवदुर्गा येथे निवास व दुसऱया दिवशी सकाळनंतर पालखी गावागावातून परतताना भाविकांनी ओवळणी करण्यात आली. यावेळी सर्वत्र कौलप्रसादाचे वाटप करण्यात येते. पालखी मंदिरात पोचल्यानंतर तिथे आरत्या, तीर्थप्रसादाने रविवारी रात्रो उत्सवाची सांगता झाली. तुळशीदास जल्मी, राजेंद्र कुंडईकर, थाणू जल्मी, गजानन जल्मी, हेमंत जल्मी यांच्या यजमानपदाखाली उत्सव साजरा करण्यात आला. कोरोना मार्गदर्शक तत्वाचे पालन करीत भाविकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेत दसरोत्सवाची सांगता झाली.









