वार्ताहर/ हिंडलगा
हिंडलगा येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवी यात्रेच्या शेवटच्या दिवशी शनिवार दि. 20 रोजी सकाळी ‘तरुण भारत’चे समूह प्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी हिंडलग्याला भेट देऊन श्री लक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. याप्रसंगी यात्रोत्सव संघातर्फे किरण ठाकुर यांना आरतीचा मान देण्यात आला.
प्रारंभी यात्रोत्सव संघाचे अध्यक्ष कृष्णा पावशे व पदाधिकाऱयांच्यावतीने किरण ठाकुर यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. याप्रसंगी बोलताना किरण ठाकुर यांनी यात्रोत्सव संघाच्या आयोजनाबाबत कौतुक करून लक्ष्मी यात्रेमुळे समाज संघटित होतो. एकमेकांचे तुटलेले संबंध जुळण्यास मदत होते, असे मत व्यक्त करून यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांचा यात्रोत्सव संघातर्फे सत्कार करण्यात आला. किरण ठाकुर यांच्या हस्ते यात्रोत्सव संघाचे अध्यक्ष कृष्णा पावशे, खजिनदार उदय नाईक, सेक्रेटरी प्रकाश बेळगुंदकर, मार्गदर्शक रमाकांत पावशे, ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर व निवृत्त सैन्याधिकारी चंद्रकांत कडोलकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब काकतकर, शिवप्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे, कॅपिटल वन सोसायटीचे चेअरमन शिवाजी हंडे, सुहास किल्लेकर, मराठा युवक संघाचे पदाधिकारी शिवाजी हंगीरगेकर यांच्यासह यात्रोत्सव संघाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश बेळगुंदकर यांनी केले. उदय नाईक यांनी आभार मानले.









