नवी दिल्ली
किया मोर्ट्सची विक्री सुधारली असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये पहिली कार सादर केल्यानंतर 10 महिन्याच्या कालावधीच्या दरम्यान 50,000 चा आकडा पार केला असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. सदर वाहनांमध्ये सेल्टॉस आणि कार्निवल मॉडेलचा यामध्ये समावेश आहे. कंपनीने पहिली कार दाखल केल्यानंतरच्या काळातील विक्रीची आकडेवारी समाधानकारक असल्याचे म्हटले आहे. आम्ही जास्तीत जास्त ग्राहक मिळवण्यासाठी आणि त्यांना अधिकच्या सुविधा देण्याचा आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचा विश्वास किया मोटर्सचे इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुखिम शीम यांनी म्हटले आहे.









