ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दक्षिण कोरियाची प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी असलेल्या ‘किया मोटर्स’च्या ‘कार्निवल’ला भारतात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. एकाच दिवसात या कारच्या 1410 युनिटचे बुकींग झाले आहे. किआ मोटर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ कुकह्यून शिम यांनी ही माहिती दिली आहे.
सेल्टॉसनंतर कियाने ‘कार्निवल’ ही कार भारतात लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. लाँचिंगपूर्वीच या कारला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कार्निवल ही कार बाजारातील टोयोटा इनोव्हाला टक्कर देणार आहे. किआ कार्निवलची किंमत 24 ते 30 लाख रुपयांदरम्यान असेल.
या एमपीव्हीमध्ये बीएस 6 उत्सर्जन मानकांची पूर्तता करणारे 2.2 लिटर 4 सिलिंडर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन मिळण्याची शक्मयता आहे. हे इंजिन 202 एचपी पॉवर आणि 441 एनएम टॉर्क जनरेट करेल. यासोबतच 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनही मिळण्याची शक्मयता आहे.









