प्रतिनिधी / घुणकी
किणी येथील ग्रामीण आरोग्य केंद्राला मंजुरी ग्रामस्थाकडून आनंदोत्सव १४.२१ कोटींचा निथी मंजूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघात प्रणव क्षेत्र व परिसरातील घुणकी वाठार सह मोठी लोकसंख्येची असलेली गावे पाहता सन 2011-2012 पासून आरोग्य केंद्राच्या मंजूरीसाठी अनेकांनी खुप प्रयत्न केलेअथक परिश्रम घेतले असे किणी गावातील बहुचर्चित ग्रामीण आरोग्य केंद्राला मंगळवार दि. ६ रोजी महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळालेचे पत्र प्रात झाले आहे .
राष्ट्रीय महामार्गावरील अपघातग्रस्त यांचे किणी गावातील नागरिकांची सोय व्हावी यासाठी गावात ग्रामीण आरोग्य केंद्र व्हावे यासाठी खुप प्रयत्नानंतर आज मंजुरी मिळाली. यासाठी किणीचे सुपुत्र व मंत्रालयीन अधिकारी स्वर्गीय सुहास चव्हाण यांचे खुप मोठे योगदान आहे. तसेच सन 2010 ते 2015 आणि सन 2015 ते 2020 या दोन पंचवार्षिक कालावधी मधील सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य तसेच ग्राम विकास अधिकारी कटारे , कदम, पंडित यांचे बहुमोल सहकार्य मिळाले तसेच सर्व आजी माजी खासदार, आमदार, गावचे नेते संजय पाटील यांचे सह आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी व पदाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी व मंत्रालयातील विविध विभागांचे अधिकारी तसेच या कामासाठी ज्या ज्ञात अज्ञात लोकांचे सहकार्य मिळाले त्यांचे किणी ग्रामस्थांनी आभार मानले.
Previous Articleकोरोनाचा कहर : नागपूरमध्ये तब्बल 5,338 नवे रुग्ण ; 66 मृत्यू
Next Article दर्जेदार आरोग्य सेवा हा मूलभूत हक्क : आरोग्यमंत्री









