जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान
ओटवणे /प्रतिनिधी-
दाणोली सजाचे कोतवाल काशिराम जाधव यांनी सन २०२० – २०२१ या महसुली वर्षात महसुल विभागाच्या धोरण व उद्दिष्टाप्रमाणे सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना आदर्श कोतवाल पुरस्काराने जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.
महसूल दिनी ओरोस येथे आयोजित कार्यक्रमात श्री. जाधव यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या १७ वर्षातील प्रामाणिक कामाचा गौरव करण्यात आला. त्यांच्या या पुरस्कराने दाणोली तलाठी कार्यालयाच्या शिरपेचात आपण मानाचा तुरा रोवलाआहे. यावेळी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी व प्रांताधिकारी सुशांत खांडेकर आदी अधिकारी उपस्थित होते.









