प्रतिनिधी / सरवडे
जिल्ह्यातील बहुतांशी भागाला शेती आणि पिण्याचे पाणी पुरवणारे राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी
दूधगंगानगर येथील राजर्षी शाहू धरण परिसरात गेले दोन दिवस पावसाने जोर धरला असल्याने धरण ९२.१० टक्के भरले आहे. धरणाच्या सांडव्यावरून १७०० कुसेक्स तर जलविद्युत केंद्रातून १८०० कुसेक्स असे एकुण ३५०० कुसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. आज धरणात ९२.१० टक्के म्हणजेच (२३.३८ ) टी. एम. सी. इतका पाणी साठा झाला आहे. पावसाचा जोर लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग सुरु केला असून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
आज काळम्मावाडी धरण परिक्षेत्रात ११९ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून आज अखेर धरण क्षेत्रात २८५५ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे .यामुळे आजची धरणाची पाणी पातळी ६४४.३१ मिटर तर पाणीसाठा ६४६ मी. म्हणजेच ९२.१० टक्के (२३.३६८ टी.एम.सी.) इतका झाला आहे .जिल्ह्यातील अधिक पाणीसाठा असणारे हे धरण असून जिल्ह्यातील बहुतांशी भाग व कर्नाटकला या धरणातून पाणी पुरवठा केला जातो. हे धरण ९२ टक्के भरल्याने समाधान व्यक्त होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









