अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे पाईपलाईनला धोका, पनोरी ग्रामस्थांनी रोखले पाणी
प्रतिनिधी / सरवडे
कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन योजना केली जात आहे. या योजनेचे काम रखडले असतानाच या योजनेसाठी टाकलेल्या पनोरी गावाजवळ पाईपलाइनचा टेस्टींग होल उघडा ठेवल्याने त्यामध्ये सद्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाचे माती मिश्रीत पाणी शिरले आहे. पाईपलाईनमध्ये माती मिश्रीत पाणी शिरल्याने या पाईप गाळाने तुंबून पाईपलाईनला धोका निर्माण होणार आहे. याकडे अधिकार्यांचे दुर्लक्ष असून पनोरी ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून होलमध्ये जाणारे पाणी रोखले आहे.
रखडलेल्या पाईपलाईनचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी नेते मंडळी प्रयत्न करीत असताना महापालिका अशा गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करीत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान याची माहिती मिळताच पालकमंत्री सतेज पाटील व महापालिका आयुक्त यांनी तात्काळ सुचना दिल्यानंतर टेस्ट होल झाकण्यात आले.
थेट पाईपलाईन योजनेचे काम अनेक वर्षे रखडले आहे. नेते मंडळी हि योजना लवकरच सुरू होणार अशी घोषणा करीत आहेत. मात्र योजनेच्या कामाला अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. सद्या काळम्मावाडी परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पनोरी गावाजवळून थेट पाईपलाईन योजना गेली असून याठिकाणी पाईपलाईनच्या हायड्रो टेस्टसाठी मोठे होल ठेवले आहे. हे होल न झाकल्यामुळे सध्या कोसळणार्या पावसाचे माती मिश्रीत पाणी, कचरा होलमधून पाईपलाईनमध्ये शिरत आहे. गाळमिश्रीत पाणी पाईपमध्ये साचून पाणी वहनासाठी त्याचा अडथळा निर्माण होणार असून पाईपलाही धोका होवू शकतो. पावसाळ्यापूर्वी अशा कामांची पुर्तता करणे गरजेचे होते मात्र संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
पाईपलाईनमध्ये पाणी शिरत असल्याचे पनोरी ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच प्रसंगावधान राखून सरपंच तुकाराम परीट संजय गांधी निराधार योजना सदस्य अजित देसाई ,संदीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य विजय बर्गे, संजय सूर्यवंशी, भरत भोसले यांनी भर पावसात भिजत पाणी रोखण्याचे काम केले आहे. परंतु गेले चार दिवस या परिसरात संततधार पाऊस सुरु असून या पाईपमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असणार. महापालिकेने गांभीर्य लक्षात घेऊन पाईपलाईनच्या हायड्रो टेस्ट ठेवलेले होल झाकण्याची गरज आहे.
सुचनेकडे दुर्लक्ष
या योजनेच्या पाईपमध्ये गतवर्षी पावसाळ्यात देखील पाणी शिरले होते,त्यावेळी बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक नंदकिशोर सूर्यवंशी यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी तात्काळ गावातील युवकांना घेऊन पाईप जाणारे पाणी रोखले होते. तसेच याची माहिती संबधितांना दिली होती मात्र त्याचे गांभीर्य घेतले नाही. यावर्षी देखील शिरणारे माती मिश्रीत पाणी रोखण्यासाठी त्यांनी पावसात भिजत पुढाकार घेतला. तसेच संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना त्याची कल्पना दिली. आता तरी याकडे महापालिका लक्ष देणार का? असा सवाल त्यांनी केला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









