नागरिकांची मागणी, पोलिसांनी कडक भूमिका घ्यावी अन्यथा तरुण पिढीवर परिणाम
वाळपई प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयात साजरे होणारे कालोत्सव व जत्रोत्सव यांच्या निमित्ताने पटाचा जुगार यांना मोठय़ा प्रमाणात फोफावण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. त्यासंदर्भाची पूर्वतयारी पत्त्यांचा जुगार करणाऱयाकडून करण्यात येत असल्याचे समजते. अशा प्रकारच्या पत्त्यांचा जुगार मोठय़ा प्रमाणात या भागांमध्ये पोहोचल्यास त्याचे प्रतिकूल परिणाम या भागातील युवा पिढीवर होण्याची शक्मयता असल्यामुळे या पत्त्यांचा जुगार विरोधात पोलिसांनी धडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
अन्यथा सत्तरी तालुक्मयातील काही जागरूक युवक याच्याविरोधात वरि÷ अधिकाऱयांकडे धाव घेण्याची शक्मयता आहे. याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयामध्ये मोठय़ा प्रमाणात कालोत्सव जत्रोत्सव साजरे करण्यात येत असतात. प्रत्येक गावांमध्ये कालोत्सव साजरा करण्याची प्रथा अनेक वर्षांपासून रूढ झालेली आहे. यामुळे हल्लीच्या काळामध्ये याला जोडूनच जुगार सुरू करण्यात येत असतो. जुगाराच्या माध्यमातून कालो साजरा करणे ही वेगळय़ा प्रकारची अनिष्ट प्रवृत्ती सत्तरी तालुक्मयामध्ये रुजू होऊ घातलेली आहे .देवळाच्या समोर सादर होणारी नाटके व देवळाच्या मागे मोठय़ा प्रमाणात लाखो रुपयांची उलाढाल करणारा पत्त्यांचा जुगार असे विचित्र स्वरूप सध्या सत्तरी तालुक्मयांमध्ये पहावयास मिळत आहे. याबाबत जागरूक नागरिकांनी तीव्र स्वरूपाची नाराजी व चिंता व्यक्त केलेली आहे .
पोलिसांनी अशा प्रकारच्या विरोधात कारवाई न केल्यास येणाऱया काळात या भागातील तरुण पिढीवर त्याचे अनिष्ट परिणाम होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही .गेल्या काही वर्षापासून जुगारावर पोलिसांनी अजिबात कारवाई केलेली नाही. यामुळे आज मोठय़ा प्रमाणात या जुगारावर या भागातील तरुण पिढी आपले भविष्य उध्वस्त करताना दिसत आहेत .मध्यंतरी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या जुगाराच्या विरोधात कडक भूमिका घेऊन हा जुगार उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र जुगार वाल्यांकडून वेगवेगळय़ा माध्यमातून या तरुणांना धमक्मया देण्याचे सत्र सुरू केल्यामुळे आजही सदर जुगार मोठय़ा प्रमाणात सुरू होत असल्याचे दिसत आहे. सध्यातरी पोलीस यंत्रणेचे महत्त्वाचे कार्य असून त्यांनी अशा प्रकारच्या जुगाराला वाव देऊ नये अशा प्रकारची मागणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सत्तरी तालुक्मयाचे उपजिल्हाधिकारी यांनीसुद्धा यासंदर्भात अत्यंत गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या जुगारावर कारवाई न केल्यास येणाऱया काळात या जुगाराचा विस्तार प्रत्येक गावाच्या कानाकोपऱयापर्यंत पोहोचून युवा पिढी समोर भविष्य उध्वस्त होण्याचे स्वप्न निर्माण होणार असून येणाऱया काळात समाज विकासावर त्याचा प्रतिकूल परिणाम होणार आहे.सत्तरी तालुक्मयातील जागरूक नागरिकांनी या संदर्भात सरकारने कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी यासंदर्भात कारवाई न केल्यास वरि÷ अधिकाऱयांपर्यंत याबाबतीत जागरूकता निर्माण करून याभागातील पत्त्यांचा जुगार पूर्णपणे बंद करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल अशा प्रकारची माहिती अनेक जागरूक युवकांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.









