कोणत्याही ग्रंथामध्ये हिंदू, भारत वा हिंदुस्थान असा उल्लेख नाही मग ते वेदामध्ये असो, उपनिषद, रामायण वा महाभारतामध्ये असो. भगवत्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सनातनी असे खूप कमी वेळा म्हटले आहे व भारत जास्तवेळा म्हटले आहे. संकल्प करत असतानाही आपण जंबुद्विपे, भारतखंडे, भारतवर्ष इ. अशी सुरुवात करतो. याचा अर्थ हिंदुस्थान हे देशाचे मूळ नाव नाही. योग्य नाव हे भारतवर्ष असले पाहिजे. अलीकडील काळात बऱयाचशा शहरांना इतिहासाशी सुसंगत असलेले नाव देऊन ते बदलण्यात आले. तसेच भारतचे ‘भारतवर्ष’ असे करावे.
हिंदी ही आपल्या देशाची प्रादेशिक भाषा नाही. हिंदी भाषेचे मूळे हे पर्शियामध्ये सापडले आहे. जेव्हा पर्शियन लोकांनी भारतवर्षात प्रवेश केला तेव्हा देशाची प्रचलित भाषा संस्कृतम होती. हल्लेखोरांसाठी संस्कृत भाषा उच्चारण्यात फार अवघड होती. हल्लेखोर संस्कृत भाषा त्यांना जमेल त्या पद्धतीने उच्चारू लागले. मग ती भ्रष्ट होऊ लागली. त्यांचे उच्चार पाहून स्थानिक लोकही हल्लेखोर उच्चार करतात त्या पद्धतीने उच्चार करू लागले. हल्लेखोरांच्या या भ्रष्ट आवृत्तीला सुरुवातीच्या काळात हिंदुस्तानी म्हटले गेले. पर्शियन भाषेमध्ये ‘स’ हे अक्षर नाही. त्यामुळे ते ‘स’ ऐवजी ‘ह’ चा उच्चार करू लागले. या कारणास्तव ते सिंधूला हिंदू म्हणू लागले. हिंदू हा शब्द सिंधू नदीच्या जवळ राहणाऱया रहिवाशांशी संबंधित होता. या हिंदू शब्दाला आपल्या देशाच्या मोठय़ा भौगोलिक क्षेत्राच्या संदर्भात मर्यादित अर्थ आहे. त्यानंतर या चुकीमुळे भारताला हिंदू म्हणून इंग्रजीत इंडिया असे नाव पडले. हल्लेखोरांनी काही पर्शियन शब्द त्यामध्ये मिसळले. या पद्धतीने हिंदुस्थानी उदयास आली. जेव्हा अरबी अक्षरे वापरली गेली तेव्हा ती उर्दू बनली. पुन्हा एकदा स्वातंत्र्य चळवळीच्यावेळी वीरगाथांमध्ये स्थानिक लोक देवनागरी वापरू लागले. यानंतर हिंदी ही भाषा बनली. ज्या अर्थी हिंदी ही संस्कृतपासून भ्रष्ट झालेली भाषा आहे. त्या अर्थी हिंदी ही शास्त्रबुद्ध भाषा नाही. म्हणून संस्कृतची गरज आहे. संस्कृत ही अनादी काळापासून चालत आलेली भाषा आहे. वेद, उपनिषद, मनुस्मृती, प्राचीन कायदे, प्राचीन औषधी, गणित व खूप काही वाङ्मयीन साहित्य हे संस्कृतमध्ये जतन केले आहे. जोपर्यंत आपण ते वाचत नाही तोपर्यंत आपली ज्ञानसंपदा ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार आहे. ज्यावेळी संसदेमध्ये हिंदी आपली राष्ट्रभाषा असली पाहिजे का संस्कृत यावर वादविवाद सुरू होता, तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कृतच्या बाजूने उभे होते. नेहरू हिंदीच्या बाजूने उभे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टी असणारे व भाषेच्या महत्त्वाविषयी उत्कृष्ट ज्ञान असलेले नेते होते. या भाषेमुळे तळागाळातील लोकांना येणाऱया अडचणी दूर होऊन ते वरि÷ वर्गातील लोकांप्रमाणे ज्ञान मिळवू शकत होते. या भाषेमुळे तळागाळातील लोकांना वेद, उपनिषद व विज्ञानाची खूप काही पुस्तके, औषधे, गणित व वाङ्मय याचे योग्य ते विश्लेषणात्मक ज्ञान होण्यास मदत झाली असती. डॉ. आंबेडकरांना या भाषेची क्षमता किंवा संभाव्यता माहिती होती, म्हणूनच संसदेत ते या भाषेच्या बाजूने होते. खरंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘पंडित’ असे लेबल नसलेले खरे पंडित (विद्वान) होते. आपल्याला माणसाचे लेबल न पाहता त्याची विद्वत्ता पाहिली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी पाहण्यात आपण असमर्थ ठरलो आहोत. त्यांच्या येणाऱया जयंतीला म्हणजेच 14 एप्रिल 2020 रोजी हा दिवस ‘संस्कृत दिवस’ म्हणून जाहीर केला पाहिजे. आपल्याला हिंदीच्या बरोबरीने संस्कृत ही सुद्धा राष्ट्रभाषा मानली पाहिजे.
दक्षिणेला एखादे विद्यापीठ स्थापून त्याला दक्षिणशिला असे नाव देण्यात यावे. ‘दक्षिणशिला’ हा संस्कृत शब्द आहे. त्याला इंग्रजीमध्ये समानार्थी शब्द एदल्tपह एtदहा असा आहे. मुघलांच्या राज्यामध्ये क्रूर मुघलांना तोंड देण्यासाठी शिवरायांना जबरदस्त धाडस दाखवावे लागले. छत्रपती शिवाजी महाराज हे तेव्हा एका दक्षिणशिलेसारखे उभे राहिले व मुघलांची प्रत्येक तलवार ही त्याच्या युद्धतंत्रासमोर, त्याचे शौर्य व व्यवस्थापन कौशल्यासमोर निष्फळ ठरली. त्यामुळेच त्यांना ‘दक्षिणशिला’ असे म्हटले जावे. त्याचे ‘दक्षिणशिला’ असे नामकरण व्हावे या मागणीला आणखी एक कारण आहे की या प्रस्तावित विद्यापीठाने एकेकाळी भारतवर्षामध्ये असलेल्या तक्षशिलाने ज्ञानप्रदर्शन केले तसेच या ही विद्यापीठाने करावे. तक्षशिलेमध्ये खूप अलौकिक बुद्धिमत्ता असलेले लोक होते. जसे की पाणिनी, चाणक्मय, चक, जीविका व विष्णू शर्मा. आम्हाला असे वाटते की, हे विद्यापीठ तक्षशिलेची प्रतिकृती बनेल अशा पद्धतीने वाटचाल करावी.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मशाल तेवत ठेवली व भक्कम अशी पायाभरणी केली जी हल्लेखोरांचा अफगाणिस्तानपर्यंत पाठलाग करत राहिली. ‘दक्षिणशिला’ हे नाव फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच योग्य वाटते. तक्षशिलाच्या जन्मानंतरच्या 2500 वर्षानंतरही आपण तो पराक्रम करू शकलो नाही जो तक्षशिलाने केला. म्हणूनच ‘दक्षिणशिलाची’ गरज आहे. 10,000 विद्यार्थ्यांची क्षमता असलेले 300 अध्यापन वर्ग व 64 विषयांचे ते असले पाहिजे. भारतवर्षामधील सध्याच्या कोणत्याही विद्यापीठामध्ये 2,000 विद्यार्थ्यांपेक्षा जास्त विद्यार्थी क्षमता नाही. आपले भावी विद्यार्थी आपले कौशल्य जगाला दाखविण्यासाठी इंग्रजी व संस्कृत भाषेत प्रवीण असले पाहिजेत म्हणूनच आपल्याला दक्षिणशिलेची गरज आहे.
जुन्नर तालुका हा ‘वीरभूमी’ म्हणून पुनर्नामांकन करणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर पुणे जिल्हय़ातील जुन्नर तालुक्मयात झाला. त्यांच्या मुघलांच्या विरोधी लढण्याच्या असामान्य धाडसाबद्दल त्याची जन्मभूमी ही ‘वीरभूमी’ म्हणून पुनर्नामांकन केले पाहिजे. या आधी कोणीही मुघलांविरुद्ध लढण्याचे असे धाडस दाखविले नव्हते. जुन्नरला वीरभूमी व जम्मू (कट्रा) महामार्गाला शिवाई-वैष्णोदेवी राजमार्ग असे नाव देण्यात यावे. शिवनेरी किल्ल्यामध्ये शिवाई नावाची देवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाईचा आशीर्वाद घेऊन जन्माला आले होते. त्यांनी भक्कम अशी पायाभरणी केली जी हल्लेखोरांचा अफगाणिस्तानपर्यंत पाठलाग करत होती हे माता वैष्णोदेवीमुळे शक्मय झाले. हा महामार्ग दोन मंदिरांना जोडणारा आहे म्हणून त्याला शिवाई-वैष्णोदेवी राजमार्ग असे नाव देण्यात यावे.
श्रीनिवासन सुंदरराजन, बेंगलोर








