पुण्यातील मनोरुग्ण तरुण सहा महिन्यापासून होता भरकटत : कालकुंद्रीकरांकडून घडले माणुसकीचे दर्शन
प्रतिनिधी / कुदनूर
सध्या चंदगड तालुक्यात कोरोना विषाणूने डोके वर काढले आहे. अशा परिस्थितीत गेल्या दहा दिवसापासून एक मनोरुग्ण तरुण कालकुंद्रीक गावात आला होता. त्या तरुणाला त्याच्या मूळगावी पोहोचविण्यासाठी कालकुंद्रीकरांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आहे. कालकुंद्रीकरांनी दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीतून माणुसकीचे दर्शन घडले असून, त्यांचे कौतूक होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्याच्या अखेरीपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र, लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी मावळ ( पुणे ) येथील स्वप्निल गणपत पोवार हा कातकरी आदिवासी समाजातील मनोरुग्ण तरुण घराबाहेर पडला होता. तब्बल सहा महिने तो घरापासून लांब भरकटत होता. दिसेल त्या वाटेने जाणे आणि पोटाची भूख भागविण्यासाठी मिळेल ते खाणे, असा त्याचा दिनक्रम ठरला होता. फिरता-फिरता तो दहा दिवसांपूर्वी कालकुंद्री आला. गावातील काही मंडळींनी त्याची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला मात्र, फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
अखेर गजानन गावडू पाटील, विलास शेटजी, दयानंद कांबळे यांसह काही ग्रामस्थ आणि तरुणांनी त्याला बोलते करत थोडीफार माहिती मिळविली. त्याचे वाढलेले केस आणि दाढी कमी करून चांगले कपडे दिले. त्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या थोडय़ाशा माहितीतून गजानन पाटील यांनी अथक प्रयत्नातून त्याचा पत्ता मिळवत त्यांच्या घरच्या मंडळींशी संपर्क साधला.
स्वप्निलच्या घरच्यांशी संपर्क झाल्यानंतर त्याला घेऊन जाण्यासाठी गुरुवारी नेसरीत त्याची घरची मंडळी आली. माजी सरपंच दयानंद कांबळे यांनी आपल्या चारचाकीमधून स्वप्निलला नेसरीपर्यंत त्याच्या घरच्या मंडळींकडे सूपूर्त केले. कालकुंद्रीकरांनी केलेल्या प्रयत्नांमुळे एका मनोरुग्णाला त्याच्या स्वगृही पोहोचता आले. गरजुंना मदत करण्यासह सामाजिक बांधिलकीच्या या कार्यातून कालकुंद्रीतील तरुण आणि ग्रामस्थांच्या माणुसकीचे आज दर्शन घडले आहे.
आईचा आनंद गगनात न मावणारा
स्वनिलच्या घरचा संपर्क क्रमांक मिळाल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती घरच्यांना देण्यात आली. त्यानंतर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून स्वप्निलचे त्याच्या आई व घरच्यांशी बोलनं झालं. व्हॉट्सअॅपद्वारे आपल्या मुलाला खूप दिवसांनी सुखरुप पाहिल्यानंतर स्वप्निलच्या आईचा आनंद गगनात न मावणारा होता.
लहान मुलांकडून स्वप्निलला मदत
त्या तरुणाला त्याच्या गावी पोहोचविण्यासाठी गावात जमेल तेवढी आर्थिक मदत गोळा करण्यात आली. यामध्ये लहान मुलांनी आपल्याकडील खाऊसाठी जमविलेली रक्कमही स्वप्निलला दिली. याशिवाय गेल्या दहा दिवसात स्वप्निलच्या जेवणाची कमतरता लहान मुलांनी कमी पडू दिली नाही. तसेच तो स्वच्छ राहील यासाठी नियमित अंघोळीसाठी ताम्रपर्णी नदीत त्याला पोहायला घेऊन जात.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









