प्रसिद्धीच्या झोतात राहणे अनेकांना आवडते. यासाठी ते विविध अनोखे आणि जगावेगळे मार्गही शोधून काढतात. एका वधूने आपल्या लग्नाच्या वेळी कार्यालयात आपल्या भावी पतीसह ऍक्विव्हावर स्वार होऊन पेलेली एंट्री सध्या फिरोजाबाद शहरात चर्चेचा विषय बनली आहे. हेलिकॉप्टर मधून वरात, आकाशात लग्न, पाण्याखाली विवाह हे प्रकार आता तसे नवे राहिलेले नाहीत. तथापि, ही ऍक्टिव्हा वरात यांपेक्षाही अधिक भाव खावून गेली, अशी नागरीकांची प्रतिक्रिया आहे.
या वधूचे नाव अभिलाषा राम असे असून ती दिल्लीची आहे. तिचा विवाह उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्हय़ातली एका नामक गावातील युवक राहुल याच्याशी ठरला. वधू तिच्या माहेरच्या मंडळींसह वराच्या गावी विवाहासाठी पोहचली. नंतर तिने जे केले त्याची कल्पना वराकडच्या मंडळींनाही नव्हती. वधू चक्क एका ऍक्टिव्हावर स्वार झाली. तिने आपल्या भावी पतीला आपल्या मागे बसवून घेतले. नंतर ती थेट विवाहस्थळी आली आणि विवावाच्या स्टेजवर ऍक्टिव्हासह उपस्थित झाली. हे पाहून उपस्थित आवाक झाले.
या दिल्लीच्या वधूला पाहण्यासाठी आधीच कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. त्यात तिने अशा प्रकारे विवाहस्थळी एंट्री घेतल्याने तो चर्चेचा आणि कौतुकाचाही विषय झाला. होणाऱया पतीला मागे बसवून ऍक्टिव्हाचे सारथ्य करणारी अशी वधू गावकऱयांनी कधी पाहिली नव्हती. त्यामुळे ती अधिकच चर्चेची बाब झाली.









