बसस्थानक कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हद्दीत, लवकरच लोकार्पण होण्याची शक्यता
प्रतिनिधी /बेळगाव
रेल्वे स्थानकासमोरील कारवार बसस्थानकाचा कायापालट करून स्मार्ट बसस्थानक निर्माण करण्यात येत असून विकासाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच लोकार्पण होण्याची शक्मयता आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध विकास कामे राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत कारवार बस स्थानकाच्या विकासासाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. सदर ठिकाणी दहा बसेस थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पोलीस चौकी, परिवहन मंडळाचे काऊंटर, वेटींग रूम तसेच 16 व्यापारी गाळे उभारण्यात आले आहेत. बस स्थानकाच्या शेडचे काम पूर्ण झाले असून, विकासाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे बसस्थानक लवकरच नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. सदर बसस्थानक कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हद्दीमध्ये येते. त्यामुळे या ठिकाणी उभारण्यात आलेल्या व्यापारी गाळय़ांचे हस्तांतर कॅन्टोन्मेंटकडे करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून कॅन्टोन्मेंटला महसूल उपलब्ध होणार आहे. अत्याधुनिक आणि स्मार्ट पद्धतीचे बसस्थानक लवकरच बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.









