बारामती/प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या निर्णयामुळे नेहमीच चर्चेत असतात. तर त्यांच्या कार्यशैलीची भुरळ अनेकांना आहे. अजित पवार हे शनिवारी बारामीत दौऱ्यावर आहेत. आजही त्यांनी अगदी सकाळी ६ वाजता कामाला सुरुवात केली. अगदी सकाळी झालेल्या कार्यक्रमावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. तुम्ही मला कसलीही कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा, असं अजितदादा अधिकाऱ्यांना म्हणाले.
प्रत्येक शनिवारी अजित पवार बारामती दौऱ्यावर असतात. आजही अजितदादांनी बारामतीमधल्या नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावली. नेहमी प्रमाणे त्यांनी आजही सकाळी ६ वाजता कामाला सुरुवात केली. यावेळी अधिकाऱ्यांनी कुठल्याशा कामात उशीर होत असल्याबद्दल कारण सांगितलं. यावेळी अजितदादांनी मला कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा. दिवाळीपूर्वी कामे पूर्ण करा, लागेल तिथे सहकार्य करु, अशा सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.