ऑनलाईन टीम / लेह :
लडाखमधील कारगिलमध्ये मंगळवारी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. रिश्टल स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.4 एवढी आहे.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार पहाटे 5.47 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता 4.4 रिश्टल स्केल एवढी आहे. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. याआधी देखील बऱ्याच वेळा या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.









