शॉटसर्किटने घडली घटना
प्रतिनिधी/ बेळगाव
शॉटसर्किटने मोबाईल दुकानाला आग लागली. शनिवारी सकाळी बापट गल्ली येथील कार पार्किंगजवळ ही घटना घडली असून आगीत सुमारे 3 लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
गुलजार मुल्ला यांच्या मुल्ला मोबाईल शॉप या दुकानाला शनिवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास आग लागली. दुकानातून धूर येताना पाहून शेजाऱयांनी गुलजार यांना कळविले. तातडीने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. जवान पाण्याच्या बंबासह घटनास्थळी दाखल झाले. मोबाईल, संगणक आदी वस्तु आगीत भस्मसात झाल्या आहेत, असे गुलजार यांनी सांगितले. खडेबाजार पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.









