विषेश प्रतिनिधी/ पर्वरी
कोविड काळात केंदाकडून कामगार कल्याण निधीचे पैसे भाजपच्या काही कार्यकर्त्यांच्या नावावर गेल्याने काल गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा आमदार विजय सरदेसाई आमदार जयेश साळगावकर व दुर्गादास कामत यांनी ऑडिट भवनमध्ये जाऊन प्रधान महालेखपालांची भेट घेतली. या वेळी त्यांनी कामगार आयुक्त तसेच गोवा बिल्डींग कन्स्ट्रक्शन व्हेलफॅर बोर्डची चौकशी करुन या निधीची ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी महालेखपालांनी त्यांना ऑडिट करण्याचे आश्वासन दिले.
भाजप सरकारमध्ये सध्या लुबाडणूक भ्रष्टाचार व लुट सुरु आहे. कामगारांचे पैसे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या नावावर जात आहे. याची सखोल चौकशी करण्यासाठी आम्ही महालेखपालांची भेट घेलती आहे. महालेखपालांनी याची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन आम्हाला दिले. भाजपने सर्व क्षेत्रात लुट सुर केली आहे. सर्वच क्षेत्रात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. गोरगरीब कामगारांचे पैसे भाजपने लुटले आहे. या गरीब कामगारांना न्याय देण्यासाठी गोवा फॉरवर्डने या भ्रष्टाचारा विरोधात आवाज उठविला आहे. आता पुढे आम्ही लोकायुक्तांकडे जाणार असल्याचे विजय सरदेसाई यांनी सांगितले.
सर्वांनी एकत्र येण्याची गरज
भाजप सारख्या भ्रष्टाचारी सरकारल धडा शिकविण्यासाठी आम्हाला सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. आमची काँगेसच्या काही नेत्यांशी बोलणी झाली आहे. आम्ही गोव्याच्या हितासाठी योग्य तो निर्णय घेणार आहे. गोवा फोरवर्ड हा स्थानिक पक्ष असल्याने राष्ट्रीय समस्या न घेता गोव्यातील समस्यावर आवाज उठवत आहे. सध्या गोव्यात भ्रष्टाचार व लुबाडणूक मोठय़ा प्रमाणात सुरु आहे. औद्योगिक जाग्यांची मोठय़ा किंमतीत व्रिकी केली जात आहे. औद्योगिक क्षेत्रात लुट सुरु आहे. सरकारने याच्यावर स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे, असेही यावेळी विजय सरदेसाई म्हणाले.
कोरोना नियंत्रणात ठेवण्यात सरकारला अपयश
सध्या गोव्यात कोरोनाचे रुग्ण झपाटय़ाने वाढत आहे. तसेच मृत्यू दरही वाढत आहे. भाजप सरकारला कोरोना नियंत्रणात ठेवण्यात अपयशी ठरले आहे. आता देवानेच गोव्याला सावरण्याची गरज आहे. वैद्यकीय कामगारांना कमी दर्जाची कोराना किट दिली जात आहे. रुग्णांची योग्य तपासणी होत नाही. त्यामुळे मृत्यूदर वाढला आहे. या सरकारला याचे काहीच पडले नसून फक्त भ्रष्टाचार करणे त्यांना कळत आहे, असा अरोप यावेळी विजय सरदेसाई यांनी केला.









