ऑनलाईन टीम / काबुल :
अफगाणिस्तानातील काबूलच्या उत्तरेकडील टोकाला शनिवारी रात्री उशिरा इंधन टँकर्सना भीषण आग लागली. या भीषण आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 14 जण जखमी झाले आहेत.
गृह मंत्रालयाचे प्रवक्ते तारिक एरियन यांनी रविवारी सांगितले की, तपास यंत्रणा जळालेले टँकर आणि गॅस स्टेशनची कसून चौकशी करीत आहेत. गॅस स्टेशनलाही यावेळी आग लागली होती. ही आग चुकून लागली की मुद्दाम लावली गेली हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, ही घटना अशावेळी घडली, जेव्हा अमेरिका आणि नाटोचे शेवटचे सैन्य अफगाणिस्तानातून परतत होते.
11 सप्टेंबरपर्यंत अफगाणिस्तानातून 2500 ते 3000 अमेरिकन सैन्य आणि सुमारे 7000 नाटो मित्र राष्ट्रांच्या सैन्याला मागे घेण्यात येणार आहे. 11 सप्टेंबर 2001 मध्ये अमेरिकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हे सैन्य अफगाणिस्तानात पाठवण्यात आले होते.