प्रतिनिधी / काणकोण
सगळयाच गोष्टी सरकारावर सोडून देऊन नुसती टीका करण्याचीच सवय ज्याना जडली आहे अशा व्यक्तींना राजबाग तारीर येथील धुरी कुटुंबाने एक चांगला धडा घालून दिला आहे. चार रस्ता ते माशे पर्यंतच्या मनोहर पर्रीकर बगल मार्गावर चंदन धुरी, कुंदन धुरी, राजेश धुरी आणि कुटुंबाने राजबाग ते तळपण पूलापर्यंत शोभेची झाडे लावली आहेत.
ही झाडे वाढल्यानंतर या मार्गावरून रात्रीच्या वेळी दोन्ही बाजूने वाहतूक करणाऱया वाहन चालकांची बऱयापैकी सोय होणार आहे. श्री. धुरी कुटुंबाने केवळ सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून केलेल्या या कामाचे कौतुक करण्यात येत आहे.









