व्हनाळी / वार्ताहर
व्हनाळी(ता. कागल) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी छाया तानाजी सुतार यांचे बिनविरोध निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी मंडल अधिकारी व्ही.पी जाधव होते.
नीलम मर्दाने यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिलेल्या रिक्त जागेवर, आज झालेल्या सरपंच पदाच्या निवड सभेत छाया सुतार यांचे नाव आनंदा सुतार यांनी सुचवले. त्याला उपसरपंच शरद पाटील यांनी अनुमोदन दिले.
यावेळी नूतन सरपंच छाया सुतार यांचा पंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य सौ. कस्तुरी निचीते, भारती पालकर, विमल चौगले, अमृता कुळवमोडे, सचिन कळंत्रे, आनंद सुतार, सुरेश कांबळे, तसेच के.बी. वाडकर, सुरेश मर्दाने, एम .टी.पोवार, श्रीनिवास कदम,सुरेश हात्रोटे,के.एम.जाधव,जगदिश वाडकर तलाटी गीता मुंडे, शिवाजी जाधव आदी उपस्थित होते. आभार ग्रामसेवक जगताप यांनी मानले.
Previous Articleनोटीस काढली 14 लाख 98 हजारची, परत केले फक्त 5 लाख रूपये
Next Article सांगली जिल्ह्यात दोन दिवसांत 377 नवीन रूग्ण वाढले









